वंजारा तितुका मेळवावा धर्म आपुला वाढवावा!!!
वंजारी समाज बांधवांनो महाराष्ट्रामध्ये आपण गेली कित्येक वर्ष झाली पाहत आहोत आपल्या जातीला नेहमी दूरच ठेवले जाते. इतिहासात सुद्धा मोठ मोठी कामे करूनहि आपल्याला दूर ठेवण्यात आले. या मागची करणे काहीही असोत पण आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून अनेक त्यांनी वंजारांच्या अनेक गोष्टींना न्याय मिळवून दिला. साहेबांमुळे एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली. आता बारी आपली आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवायची, कुठेतरी आपली ओळख जगाला दाखवायची!
आपल्या समाजात युवक युवतींची कमी नाही शिक्षणाची सुद्धा कमी नाही. चांगल्या चांगल्या पदान्वर्ती आपली जनता राज्य करत आहे. यातूनच वेळात वेळ काढून चार दोन तास जरी आपण आपल्या मागे राहिलेल्या समाज बांधवांना दिले, त्यांनअ एकत्र आणून त्यांच्यासाठी काही करू शकलो तर त्यापेक्षा अधिक पुण्य ते कोणते?
आज महाराष्ट्रामध्ये भाई ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय साहेबांच्या प्रेरणेने वंजारी युवक संघटना कार्यरत आहे. संघटनेचे कार्य हे पूर्णपणे समाजासाठी असून ते राजकारण विरहित आहे. समाजातील काही सुशिक्षित तरुण एकत्र येउन स्वखर्चाने संघटना चालवत आहेत. समाज बांधवांचे मेळावे आयोजित करणे, नवीन तरुणांना सामील करणे, ठिकठिकाणी शाखा स्थापना करणे, मुला-मुलींना भविष्यासाठी मार्गदर्शन करणे, वाढू-वर परिचय मेळावे आयोजित करणे, इत्यादी प्राथमिक स्वरूपाचे कार्यक्रम सध्या संघटना राबवत आहे. पुढे कॅरीर सोबतच लग्नासाठी व भविष्यासाठी मुलींना खास मार्गदर्शन, युवक शिबिरे, आरोग्य शिबिरे, खेडे जोड अभियान, ग्रामसफाई, असे अनेक कार्यक्रम संघटना हाती घेणार आहे. या सर्वांसाठी मित्रहो आपले सहकार्य हवे आहे. शेवटी गाव करील ते राव काय करील? आपल्या समाजाच्या विकासासाठी हि हक्काची आर्त हाक मारत आहे, लवकर संघटनेत सामील होऊन जमेल त्या प्रकारच्या उपक्रमात सामील व्हा.
शेवटी विकास हा सर्वांचा हक्क आहे, तोंड वाजवून नाही मिळाला तर तोंडात वाजवून का असेना पण मिळवणारच! " वंजारी युवक संघटनेत" सामील व्हा!!! आपल्याला वाचायला कोणताही इतिहास नव्हता पण आपण असा इतिहास घड्वुया जो आपले नातू पनतु अभिमानाने वाचतील!!!!
Friends there is no way to run from fate & fortune, but this is a way where we can build a better future for upcoming generation. There is no superhero to come for us, we ourself have to change our common life & be a hero of our own life! Join Vanjari Yuvak Sanghatana today and feel the change here! Be a part of itt!! be a part of the Vanjari flame in me & u!!!
सुधीर सांगळे
सदस्य भा. ज. यु. मो. महाराष्ट्र प्रदेश
सदस्य वंजारी युवक संघटना महाराष्ट्र राज्य
(मो. ९९६०६४ ७७७७)
Saturday, January 9, 2010
Subscribe to:
Posts (Atom)